राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा जुना सल्ला – व्हिडीओ व्हायरल

शिवसेना ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना उद्देशून दिलेला सल्ला पुन्हा चर्चेत आला आहे.

राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा जुना सल्ला – व्हिडीओ व्हायरल शिवसेना ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना उद्देशून दिलेला सल्ला पुन्हा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बॅनरवर लावल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओत बाळासाहेब स्पष्टपणे सांगताना दिसतात की, “राज, तू शिवसेना सोडलीस, सगळ्या पदांचा राजीनामा दिलास, त्यामुळे तुला हे कटाक्षाने पाळावं लागेल. माझा फोटो तुझ्या बॅनरवर लावू नकोस.”

बाळासाहेबांनी हे वक्तव्य राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडल्यावर केलं होतं. ते म्हणाले होते, “नातं तुटलं नाही असुद्या, पण तुझ्या राजकीय वाटचालीत माझा फोटो वापरणं टाळावं.”

या व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि प्रभोधनकार ठाकरे यांचे फोटो झळकल्याने ही चर्चा अधिक रंगली आहे.

राजकीय वर्तुळात या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून आगामी राजकीय हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top