मुक्ताईनगरच्या यात्रेदरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या नातीची छेड काढणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून, त्यांच्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींवरही लवकरच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी या घटनेतील आरोपी एका विशिष्ट पक्षाचे असल्याचा उल्लेख केला असून, त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. या प्रकरणामुळे स्थानिक आणि राज्यभरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सरकार आरोपींवर कठोर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट संकेत देत, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.