माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा – आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही समान शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा – आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही समान शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

1995 मध्ये महाडच्या गृहनिर्माण योजनेतील मुख्यमंत्री 10% कोट्यातून घरे मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर सिद्ध झाला. स्वतःचे घर नसल्याचे आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे भासवून त्यांनी दोन घरांचा लाभ घेतला. इतकेच नव्हे, तर अन्य पात्र लाभार्थ्यांना मिळालेली घरेही स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे समोर आले.

याशिवाय, ही घरे मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या गैरव्यवहाराची तक्रार माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली, आणि त्यानंतर कोकाटे बंधूंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोर्टाचा निर्णय आणि पुढील प्रक्रिया

27 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर, 10 साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे कोकाटे बंधूंना दोषी ठरवण्यात आले. त्यांना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, महाडमधील फ्लॅट्स शासनाला परत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तथापि, शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

हा निकाल त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर परिणाम करू शकतो का, हे आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top