महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासात गती आणण्यासाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी विशेष तपास पथक (SIT) मध्ये तीन अधिकाऱ्यांची नावे सुचवली आहेत: IPS अधिकारी पंकज कुमावत, निरीक्षक संतोष साबळे आणि सहाय्यक निरीक्षक सपकाळ.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या अधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त करत, “आम्ही राजकारणी कोणत्याही लोकांची नावं दिलेली नाहीत. कारण माझा नवरा राजकारणी नव्हता हे झालं ते प्लॉटमुळे. वाल्मिक कराड खुनात नसेल तर तपास का थांबवला?” असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.