मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठे विधान करत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारपर्यंत आरक्षणाचा तिढा सोडवतील.

फडणवीसांच्या निर्णयावर मोठी अपेक्षा
मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण दिले असले तरी, ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे, या त्यांच्या प्रमुख मागणीवर ते ठाम आहेत. आता फडणवीस या विषयावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
‘आम्ही स्वागतासाठी तयार’ – जरांगे पाटील
जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा प्रश्न सोडवतील. आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मंगळवारपर्यंत नेमका काय तोडगा निघतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर प्रतिक्रिया
दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. या संदर्भात बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सुरेश धस यांच्यावर आम्हाला विश्वास होता, मात्र त्यांच्यावर दबाव असल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली असावी.”
फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “पूर्वी फडणवीस लोकांचे ऐकायचे, मात्र आता त्यांना सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही, माझ्यासोबत नेहमीच मराठा समाज राहिला आहे.”
‘धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत?’
अजित पवार यांनी एकदा राजीनामा दिल्याचे नमूद करत जरांगे पाटील यांनी सवाल केला, “जर अजितदादांनी राजीनामा दिला असेल, तर धनंजय मुंडे तसे का करत नाहीत?