मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

भोवळ आल्याने रुग्णालयात हलवले
आज सकाळी काही कार्यकर्ते आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांना अचानक भोवळ आली. यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल केले.
सततच्या आंदोलनाचा आरोग्यावर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अनेकदा बेमुदत उपोषण केले. या सातत्याच्या उपोषण आणि प्रवासामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाला असून, त्यामुळेच त्यांची तब्येत खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संपूर्ण राज्याचे लक्ष प्रकृतीच्या स्थितीकडे
त्यांच्या तब्येतीबाबत चिंतेचे वातावरण असून, समर्थक आणि मराठा समाजातील अनेक लोक त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी साऱ्यांची अपेक्षा आहे.