मनसेचा नवा निशाणा – मेट्रो स्थानकांवरील मराठी नावांसाठी दोन दिवसांची अल्टिमेटम!

मुंबईतील मेट्रो सेवेचा विस्तार वेगाने सुरू आहे आणि मेट्रो ३ चा दुसरा टप्पा – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक – लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मात्र, या नव्या टप्प्याच्या उद्घाटनाआधीच मेट्रो स्थानकं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) लक्षात आली आहेत.

मनसेचा नवा निशाणा – मेट्रो स्थानकांवरील मराठी नावांसाठी दोन दिवसांची अल्टिमेटम! मुंबईतील मेट्रो सेवेचा विस्तार वेगाने सुरू आहे आणि मेट्रो ३ चा दुसरा टप्पा – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक – लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मात्र, या नव्या टप्प्याच्या उद्घाटनाआधीच मेट्रो स्थानकं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) लक्षात आली आहेत.

अलीकडेच, मनसेने बँकांमध्ये मराठी कामकाजासंदर्भात जोरदार आंदोलने केली होती. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात या विषयाला हात घालून मनसैनिकांना बँकांमध्ये मराठी वापर तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी काही बँकांमध्ये भेट देत हलगर्जीपणावर सवाल उपस्थित केला होता.

आता त्याच धाटणीने, मनसेने आपला लक्ष वेधलंय मुंबई मेट्रो स्थानकांवर. सिद्धिविनायक स्थानकाबाहेरील फलकावर फक्त इंग्रजी नाव दर्शवले गेले असून, त्यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

“मराठी भाषेचा अपमान? नकोय आम्हाला अशा मेट्रोचा माज!”
मनसेने मेट्रो प्रशासनाला तात्काळ मराठीतही नाव फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी फक्त दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा, “मनसे स्टाईल”ने उत्तर दिलं जाईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे.

मनसेच्या मते, मुंबईतील सार्वजनिक सेवांमध्ये मराठी भाषेला योग्य स्थान मिळणं आवश्यक आहे. “मेट्रोला मराठीबद्दल द्वेष वाटतो का?” असा थेट सवाल करत, मनसेने आता मेट्रो स्थानकांवर मराठी वापर सुनिश्चित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top