केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्याचा प्रकार जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रा दरम्यान काही टवाळखोरांनी मंत्री खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्वरित दखल घेतली आहे. त्यांनी मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांसोबत चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जर केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील महिलाही असुरक्षित असतील, तर सामान्य महिलांचे संरक्षण कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पुढील तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.