भारतानं बांगलादेशाच्या अतिरेक्यांना धडा शिकवत एक मोठं आर्थिक पाऊल उचललं आहे. बांगलादेशातील धर्मांध व कट्टर प्रवृत्ती भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत होत्या, पण भारतानं त्यावर कठोर निर्णय घेत या देशावर आर्थिक निर्बंध लावले आहेत.

भारताकडून बांगलादेशाला 2020 पासून दिली जाणारी ट्रांसशिपमेंट सेवा आता थांबवण्यात आली आहे. यामुळं बांगलादेश आपल्या मालाचा निर्यात व आयात व्यवहार भारताच्या भूभागातून करत होता. नेपाळ, म्यानमार आणि भूतानमध्ये होणाऱ्या व्यापारावर याचा मोठा परिणाम होणार आहे.
या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील सत्ताधारी सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनमध्ये भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. भारताच्या उत्तरपूर्व भागाचा उल्लेख करून त्यांनी चीनला या भागात गुंतवणुकीचं आमंत्रण दिलं होतं. याचाच प्रतिउत्तर म्हणून भारतानं ही आर्थिक कारवाई केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनूस यांच्यात नुकतीच थायलंडमध्ये बैठक झाली. या बैठकीत भारतानं हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र युनूस यांनी यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बांगलादेशातील कापड आणि उत्पादन उद्योगाला बसणार आहे. भारताने आपल्या सहनशीलतेचा अंत झाल्यावर घेतलेलं हे टोकाचं पाऊल, आता बांगलादेशातील अराजकतेला आणखी चुणूक देणार आहे. कट्टरतेच्या मार्गावर चालणाऱ्या बांगलादेशाला आता जागतिक स्तरावर मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.