भाजपकडे काँग्रेसचा मोठा बुरूज? भोरचे नेते संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी हालचाल घडत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते संग्राम थोपटे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडे काँग्रेसचा मोठा बुरूज? भोरचे नेते संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी हालचाल घडत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते संग्राम थोपटे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संग्राम थोपटे यांनी नुकतेच त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवरील कव्हर फोटो बदलला आहे. यापूर्वीच्या कव्हर फोटोवर काँग्रेसचे हाताचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. मात्र आता नव्या कव्हर फोटोमध्ये केवळ त्यांचा फोटो व नाव आहे, काँग्रेसचे चिन्ह पूर्णपणे हटवण्यात आले आहे. या बदलामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अधिकच गती मिळाली आहे. अद्याप थोपटे यांनी अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा केलेली नसली तरी ते रविवारी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपकडून संग्राम थोपटे यांना पक्षात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त आहे. भाजपची योजना म्हणजे पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः शरद पवार यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात आपले बळ वाढवणे.

संग्राम थोपटे यांनी जर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर हे काँग्रेससाठी केवळ भोरमध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारे ठरेल. भोर हा मतदारसंघ त्यांच्या कुटुंबासाठी खास ओळखला जातो. संग्राम थोपटे यांच्या वडिलांनीही सहा वेळा याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांची लोकांमध्ये मजबूत पकड आहे.

विशेष म्हणजे, थोपटे हे सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. त्यामुळे त्यांचा भाजपकडे झुकाव झाल्यास, येणाऱ्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातही महत्त्वाचा फरक पडण्याची शक्यता वर्तवली जाते.

दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र संग्राम थोपटे यांच्या हालचालींनी काँग्रेस गोटात चिंता वाढली आहे. त्यांच्या पक्ष बदलाची अधिकृत घोषणा होताच पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *