बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवे पुरावे उघडकीस आले आहेत. तपास यंत्रणांनी या प्रकरणात मोठा खुलासा करताना मारहाणीत वापरण्यात आलेल्या लोखंडी पाईपचे १५ तुकडे जप्त केले आहेत. या तुकड्यांचे फोटो आता आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले असून, त्याचा पुढील तपासात महत्त्वाचा आधार ठरण्याची शक्यता आहे.

तपास यंत्रणांना सापडले महत्त्वाचे व्हिडीओ आणि फोटो
संतोष देशमुख यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. तपास पथकाने आरोपींच्या मोबाईलमधून काही नवनवीन व्हिडिओ आणि फोटो हस्तगत केले आहेत. यातील काही डेटा डिलीट करण्यात आला होता, मात्र तांत्रिक मदतीने तो पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. या व्हिडिओंमध्ये आरोपींनी मारहाण करतानाचे आणि त्याचा आनंद लुटतानाचे दृश्य कैद केल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपास अधिकाऱ्यांनी केले मोठे उघड
या हत्येच्या तपासात पोलिस आणि सीआयडी पथक वेगाने पुढे जात आहेत. आरोपींकडून मिळालेल्या मोबाईल डेटा आणि जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा सखोल अभ्यास करून दोषींविरुद्ध भक्कड पुरावे गोळा करण्यात आले आहेत. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत या पुराव्यांचा महत्त्वाचा वापर होण्याची शक्यता आहे.