बलूच लिबरेशन आर्मीची भारताकडे मोठी मागणी – “या तीन गोष्टी दिल्यात, तर पाकिस्तानचा शेवट करू”

पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतात गेल्या अनेक वर्षांपासून असंतोष धगधगतो आहे. या भागातील रहिवासी आणि बलूच लिबरेशन आर्मी (BLA) पाकिस्तान सरकारविरोधात दीर्घकाळ संघर्ष करत आहेत. अलीकडेच बलूच लिबरेशन आर्मीने एक खळबळजनक विधान करत भारतासमोर मोठी मागणी ठेवली आहे. त्यांनी सांगितले की, भारताने जर तीन गोष्टींच्या स्वरूपात मदत केली, तर पाकिस्तानला नष्ट करण्याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे.

बलूच लिबरेशन आर्मीची भारताकडे मोठी मागणी – "या तीन गोष्टी दिल्यात, तर पाकिस्तानचा शेवट करू" पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतात गेल्या अनेक वर्षांपासून असंतोष धगधगतो आहे. या भागातील रहिवासी आणि बलूच लिबरेशन आर्मी (BLA) पाकिस्तान सरकारविरोधात दीर्घकाळ संघर्ष करत आहेत. अलीकडेच बलूच लिबरेशन आर्मीने एक खळबळजनक विधान करत भारतासमोर मोठी मागणी ठेवली आहे. त्यांनी सांगितले की, भारताने जर तीन गोष्टींच्या स्वरूपात मदत केली, तर पाकिस्तानला नष्ट करण्याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे.

BLA च्या मते, पाकिस्तान हा देश केवळ अण्वस्त्रांचा धाक दाखवतो, पण त्यामागे दहशतवाद वाढवण्याचे धोरण लपवतो. ते म्हणतात की, पाकिस्तान दहशतवादी गटांना प्रशिक्षण देतो, त्यांना संरक्षण देतो आणि संपूर्ण जगासाठी धोका निर्माण करतो. या देशाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

BLA ने भारताकडे जी तीन गोष्टी मागितल्या आहेत, त्या म्हणजे राजकीय पाठबळ, कूटनितीक सहकार्य, आणि सैन्य सहाय्य. बलूच लढवय्यांचे म्हणणे आहे की, जर भारताने ही तीन मदतीची आश्वासने दिली, तर आम्ही लगेच पाकिस्तानच्या विरोधात निर्णायक पावले उचलू. त्यांच्या मते, पाकिस्तान आता एका ज्वालामुखीवर उभा आहे आणि त्याचा स्फोट केवळ वेळेचा प्रश्न आहे.

या लढवय्यांनी म्हटले आहे की, भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर असतानाच त्यांनी हे धोरण निश्चित केले. त्यांच्या मतानुसार, भारताने पाकिस्तानाशी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांपेक्षा, पाकिस्तानमधील आतल्या हालचालींना मदत करून त्याला तोडण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे. बलूचिस्तानातील बंडखोर लढवय्ये सांगतात की, जर भारत उद्या पाकिस्तानचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही प्रथमच त्या मोहिमेस समर्थन देऊ आणि आमचे सैनिक पाकच्या पश्चिम सीमेवर तैनात करू.

BLA ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “तो दिवस फार लांब नाही, जेव्हा बलूचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास येईल. या प्रक्रियेला कोणीही थांबवू शकत नाही. जितका वेळ लागेल, तितका रक्तपात वाढेल. पण आमची दिशा आणि निर्धार बदलणार नाही.”

अखेर, त्यांनी असा दावा केला की, पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी त्यांनी आधीच रणनीती आखली आहे. “हा देश केवळ आम्हीच संपवू शकतो. त्यासाठी पाकिस्तानची मूळ रचना उद्ध्वस्त करावी लागेल, आणि ती आम्ही करूच,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top