महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा हिंदी चरित्रात्मक सिनेमा 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र वादाच्या पार्श्वभूमीवर तो 25 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सिनेमातील एकही सीन कट करू नये, कारण त्यात सत्य मांडलं आहे. सगळे ब्राह्मण फुलेंच्या विरोधात नव्हते, काही कर्मठ ब्राह्मण होते, पण अनेकांनी फुले दांपत्याला मदत केली.”
सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी देखील स्पष्ट केलं की सेन्सॉर बोर्डाने काही सूचना केल्या आहेत, ज्या मान्य करण्यात आल्या आहेत, पण कोणताही सीन कट करण्यात आलेला नाही. त्यांनी सिनेमाला “शैक्षणिक” म्हटलं आहे आणि तरुणांनी तो जरूर पाहावा, असं आवाहन केलं आहे.