‘फुले’ सिनेमावरून वाद: सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर आक्रमक, आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटातील दृश्ये हटवण्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्डाने जर आपली आक्षेपाची भूमिका कायम ठेवली, तर त्या सदस्यांच्या निवासस्थानी निदर्शने करण्यात येतील, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

‘फुले’ सिनेमावरून वाद: सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर आक्रमक, आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटातील दृश्ये हटवण्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्डाने जर आपली आक्षेपाची भूमिका कायम ठेवली, तर त्या सदस्यांच्या निवासस्थानी निदर्शने करण्यात येतील, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, सेन्सॉर बोर्डाला ‘फुले’ सिनेमाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि हा चित्रपट कोणतीही दृश्ये वगळता पूर्णपणे प्रदर्शित व्हावा, हीच आमची ठाम मागणी आहे.

यासोबतच, त्यांनी केंद्र सरकारवरही टीका करत सांगितलं की, “या देशात केवळ शासनमान्य विचारसरणीच राबवली जाणार आहे. सेन्सॉर बोर्ड आपले वैयक्तिक विचार थोपवू शकत नाही.”

प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर, ‘फुले’ सिनेमाभोवतीचा वाद अधिकच तापण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *