मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही लोक केवळ मराठी माणसाबद्दल बोलत राहिले, पण प्रत्यक्ष काहीच केलं नाही, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीसांचे ठाकरेंवर टोलेबाजी
फडणवीस म्हणाले, “आम्ही मराठी माणसाला हक्काचं घर दिलं, पण काही लोकं केवळ बोलतच राहिले. भविष्यातील माझा संकल्प आहे की, जोपर्यंत स्वयं-पुनर्विकास (Self-Redevelopment) स्वयंचलित होत नाही, तोपर्यंत आवश्यक बदल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
एकनाथ शिंदेंचीही ठाकरेंवर घणाघाती टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं की, “निवडणुका आल्या की मराठी माणूस आणि मुंबईकरांची आठवण येते. फक्त निवडणुकीपुरता मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आणला जातो.”
या टीकाटिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.