पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला ७२ तासांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला मध्यरात्री सापळा रचून अटक केली असून, आज शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.

कोर्टाबाहेर महिला आक्रमक, घोषणाबाजी
या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर जोरदार आंदोलन केले.
त्यांचा प्रश्न आहे, “आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आहे, पण आमच्या सुरक्षेचं काय?”
या आंदोलनादरम्यान महिलांनी मागण्या केल्या की:
- आरोपीला व्हिआयपी ट्रिटमेंट का दिली जाते आहे?
- दिवसाढवळ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कोण जबाबदार?
- आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.
पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले
संतप्त महिलांनी सात तास आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावर महिलांनी सांगितले की, “आम्हाला इथून हटवलं जात आहे, पण महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार काय करत आहे?”
आता पुढे काय?
आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई कशी होते आणि सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.