पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याचं राजकीय संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपीच्या राजकीय कनेक्शनबाबत धक्कादायक माहिती
- दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे.
- शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर आरोपीचा फोटो आढळून आला आहे.
- आरोपीच्या व्हॉट्सअॅप डीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे.
- गावात तो माऊली कटके यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता.
पोलिसांचा शोध आणि आरोपीची पार्श्वभूमी
- गुन्हा करून आरोपी गावात परतला आणि तिथेच मुक्काम केला.
- पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
- गेल्या काही वर्षांत चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्याच्याविरोधात नोंद आहेत.
- तो 2019 मध्ये जामिनावर सुटला आणि आता पुन्हा गंभीर गुन्हा केला.
- पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 13 पथके तयार केली आहेत.
- त्याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सरकार आणि प्रशासनावर टीका
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि विरोधकांनी सरकारवर टीका केली असून, गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळतो का? असा सवाल विचारला जात आहे.
आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आणि आरोपीच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.