पुणे बस अत्याचार प्रकरण: आरोपी अद्याप फरार, शोधासाठी पोलिसांची मोठी मोहीम सुरू

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. सोमवारी पहाटे, फलटणला जाण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली.

पुणे बस अत्याचार प्रकरण: आरोपी अद्याप फरार, शोधासाठी पोलिसांची मोठी मोहीम सुरू पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. सोमवारी पहाटे, फलटणला जाण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली.

पोलिसांचा कसून तपास, 13 पथकांची स्थापना

या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी 13 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाखाचं बक्षीस

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटवली आहे. त्याचे नाव दत्तात्रय रामदास गाडे असून तो एक गुन्हेगार प्रवृत्तीचा इसम आहे. याआधीही चोरी, दरोडेखोरी आणि चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तो 2019 मध्ये जामिनावर सुटला होता.

पोलिसांनी आरोपीबाबत कोणतीही माहिती देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणाला त्याची ठावठिकाण्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

घटनेचा तपशील

पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात थांबली असताना आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. सुरुवातीला गोड बोलून विश्वास संपादन केला आणि नंतर बस कुठे लागत नाही हे दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका बाजूला नेले. बसमध्ये कोण नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि पसार झाला.

पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

या प्रकरणावर तुमचे मत काय? अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top