पुणे बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट – आरोपीच्या पत्नीचा धक्कादायक दावा

पुण्यात स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. पहाटेच्या सुमारास बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावी सापळा रचून त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट – आरोपीच्या पत्नीचा धक्कादायक दावा पुण्यात स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. पहाटेच्या सुमारास बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावी सापळा रचून त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीच्या पत्नीचा मोठा दावा

या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. आरोपी गाडेच्या पत्नीने दावा केला आहे की, “माझा नवरा बाजारात शेतमाल विकण्यासाठी गेला होता आणि घटनेच्या वेळी तो स्वारगेट येथे घरी परतण्यासाठी थांबला होता. जे काही घडलं, ते संमतीने झालं आहे. आम्हाला कायद्यावर पूर्ण विश्वास असून, सत्य समोर यावे ही आमची मागणी आहे.”

पोलीस तपास आणि अटकेची कारवाई

गुणा गावात लपून बसलेल्या गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 13 पथकांची नेमणूक केली होती. गावात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आणि अखेर आरोपीला ताब्यात घेतले. याआधी पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस जाहीर केले होते.

वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती

पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अहवालानुसार तिला दोन वेळा अत्याचाराला सामोरे जावे लागले. या घटनेची चौकशी सुरू असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top