नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबावर तीव्र हल्लाबोल

भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जीवनशैलीवर निशाणा साधला.

नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबावर तीव्र हल्लाबोल भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जीवनशैलीवर निशाणा साधला.

नितेश राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आजपर्यंत स्वतःच्या पैशाने जेवलेले नाहीत. त्यांचे हॉटेल बीलही दुसऱ्यांकडून भरले जाते. त्यांच्या घरातील एसी व्हिडीओकॉनचा लावला गेला होता, त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी देण्यात आली.”

त्यांनी पुढे दावा केला की, “ठाकरे कुटुंबाच्या घरातील कपड्यांची धुलाई लीला हॉटेलमध्ये होते आणि त्यासाठी ‘यादव’ हे नाव वापरले जाते. त्याची पुरावे दाखवण्यासही मी तयार आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्यासाठी सँडविचेस ट्रायडेंट हॉटेलमधून मागवले जातात.”

संजय राऊतांना खुले आव्हान

संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “जर तुम्हाला ठाकरे कुटुंबाची वास्तविकता समजून घ्यायची असेल, तर माझ्यासोबत खुली पत्रकार परिषद घ्या. मी तुम्हाला त्यांचे वाहन, कपडे आणि भोजन कुठून येते, हे स्पष्ट करून सांगतो.”

या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top