“धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीनंतर पुढे काय?” – सुरेश धसांचे सूचक विधान

संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला. मात्र, हे प्रकरण यावरच थांबणार नाही, असे संकेत धस यांनी दिले आहेत.

"धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीनंतर पुढे काय?" – सुरेश धसांचे सूचक विधान संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला. मात्र, हे प्रकरण यावरच थांबणार नाही, असे संकेत धस यांनी दिले आहेत.

“मी आधीच इशारा दिला होता”

सुरेश धस म्हणाले, “१६ डिसेंबर रोजीच मी हे प्रकरण सभागृहात मांडले होते, पण तेव्हा अनेकांनी माझ्यावरच टीका केली. मात्र, आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर सत्य बाहेर आले. महाराष्ट्रभर संताप उसळला.”

“एसआयटीकडे आणखी तपास बाकी”

धस यांनी स्पष्ट केले की, एसआयटीकडे अजूनही काही लोकांचे कॉल तपासायचे आहेत आणि चौकशी सुरूच आहे. त्यांनी असेही म्हटले की, “या प्रकरणात काही अधिकारी आणि इतर लोक इन्व्हॉल्व्ह आहेत, त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”

“अजून काही प्रकरणे बाहेर येणार?”

सुरेश धस यांनी मोठा इशारा देत म्हटले, “याप्रकरणात अजून काही गोष्टी समोर येणार आहेत. अजून एक-दोन प्रकरणं बाहेर येतील. यानंतर काय होणार हे पाहावे लागेल.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धस यांनी एसआयटीकडे मागणी केली आहे की, सुदर्शन घुलेला ‘डेंजर’ बनवणाऱ्या लोकांचीही चौकशी व्हावी. त्यामुळे हे प्रकरण येत्या काळात आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top