सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत, हे दोघे मिळूनच मुंडेंना वाचवत असल्याचा दावा केला आहे.

“इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांबद्दल पुरावे सादर करूनही कारवाई होत नाही, याचा अर्थच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत,” असा आरोप दमानिया यांनी केला.
तसेच, सूरज चव्हाण यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. “मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. ते अत्यंत विद्वान आहेत आणि त्यांनी माझ्यावर टीका करण्यासाठी आणखी काही विद्वानांना पुढे केले आहे,” असे त्या म्हणाल्या.