धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांचे खंडन करताना त्यांना “अर्धवट ज्ञान आणि खोटं बोलणं” असा आरोप केला आहे. ते म्हणाले की, शासन निर्णय (जीआर) काढण्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे आणि त्याला अनेक टप्प्यांतून जावे लागते. त्यामुळे “खोटं बोलून जीआर काढला” असा दावा करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंडेंनी दमानियांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, शासन निर्णय उपसचिव, विभागीय सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मान्यतेनंतरच मंत्र्यांकडे येतो आणि त्यानंतर अंतिम मंजुरी मिळते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप चुकीचा असून, हा केवळ मीडिया ट्रायल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.