महाराष्ट्र विधानसभेत आजच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भात थेट सवाल उपस्थित केला.

सिलेक्टिव्ह निषेधावर टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना म्हटले,
“अबू आजमी यांना 100% तुरुंगात टाकू, पण सिलेक्टिव्ह निषेध करून चालणार नाही. जितेंद्र आव्हाड औरंगजेबच्या बाजूने बोलतात, त्यावर विरोधकांनी कधी निषेध केला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पंडित नेहरूंबद्दल मोठा गौप्यस्फोट
फडणवीस पुढे म्हणाले,
“पंडित नेहरूंनी ‘Discovery of India’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे, त्याचा निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का?” त्यांनी स्पष्ट केले की शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि त्यामुळे पंडित नेहरू यांचा धिक्कार झाला पाहिजे.
औरंगजेबची कबर उखडण्याची मागणी
खासदार नवनीत राणा यांनीही विधानसभेत तीव्र भूमिका घेत,
“महाराष्ट्राला औरंगजेबाचे विचार मान्य नाहीत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उखडून महाराष्ट्राच्या बाहेर फेकली पाहिजे,” अशी मागणी केली.
विरोधकांची गोंधळ घालण्याची भूमिका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण सुरू असताना, विरोधकांकडून गोंधळ करण्यात आला. त्यामुळे विधान परिषदेचे सभापतींनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केले.
सरकारची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र सरकारने अबू आजमी यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. तसेच, शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला सरकार माफ करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.