पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुद्रा कर्ज योजनेच्या 10 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

या योजनेमुळे हजारो लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत. पंतप्रधानांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षांत 50 कोटींपेक्षा अधिक कर्ज खाती मंजूर करण्यात आली असून एकूण 33 लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित झालं आहे.
या योजनेचा सर्वाधिक फायदा महिलांनी घेतला असून 68% लाभार्थी महिला आहेत. तसेच 50% लाभार्थी हे SC, ST आणि OBC समुदायातून आलेले आहेत.
लाभार्थ्यांच्या यशोगाथाही समोर आल्या आहेत. काहींनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज ते 70 हजारांहून 2 लाख रुपयांपर्यंत मासिक कमाई करत आहेत. एवढंच नाही तर ते इतरांना रोजगारही देत आहेत.
कमलेश नावाच्या लाभार्थ्याने सांगितलं की तो कपड्यांचं शिवणकाम करतो आणि आता त्याने 3 महिलांना रोजगार दिला आहे. त्याने आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेशही दिला आहे.
#10YearsOfMUDRA या हॅशटॅगखाली पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.