दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणातील महत्त्वाचा तपशील समोर आला आहे. तिचे वडील सतीश सालियान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले की, एका महिलेसोबत असलेल्या त्यांच्या संपर्कामुळे दिशाला गैरसमज झाला होता.

वडिलांच्या मदतीबाबत दिशाचा गैरसमज
सतीश सालियान यांनी सांगितले की, ते एका दिवंगत मित्राच्या पत्नीला आर्थिक मदत करत होते. हा मित्र त्यांचा व्यावसायिक भागीदार होता आणि लोणच्याचा व्यवसाय दोघांनी मिळून सुरू केला होता. मात्र, मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला आर्थिक अडचणी आल्या, म्हणून त्यांनी तिला आर्थिक मदत केली. मात्र, दिशाला वाटले की, वडिलांचे त्या महिलेसोबत वेगळे संबंध आहेत आणि यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
मित्रांच्या जबाबात काय?
पोलिसांनी दिशाच्या मित्रमैत्रिणींचे जबाब नोंदवले असता, तिने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली. मात्र, एसआयटीच्या चौकशीत सतीश सालियान यांनी हे स्पष्ट केले की, संबंध नसून केवळ आर्थिक मदत देत होते.
या नव्या खुलाशामुळे दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.