राज्यातील ड्रग्स विरोधी मोहिमेला अधिक तीव्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला स्पष्ट संदेश दिला आहे.

मुख्यमंत्र्यांचा इशारा:
- झिरो टॉलरन्स धोरण – ड्रग्स प्रकरणात कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला अडकल्यास निलंबन नाही, थेट बडतर्फी होईल.
- पोलिसांनी गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.
- महिला अत्याचार प्रकरणात आरोपपत्र वेळेत दाखल होईल यासाठी विशेष ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
संपत्ती परत मिळणार
- नवीन कायद्यानुसार, गुन्ह्यात जप्त केलेली संपत्ती सहा महिन्यांत मूळ मालकाला परत केली जाणार.
- यामुळे पोलीस ठाण्यातील अनावश्यक जप्त माल कमी होईल आणि नागरिकांचा त्रास कमी होईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरण:
- पोलिसांनी संपूर्ण पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
- सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या कठोर भूमिकेमुळे राज्यातील ड्रग्स आणि गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.