आज २७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिन, आणि याच दिवशी ठाणे महापालिकेच्या एका जीआरमुळे वाद निर्माण झाला आहे.

जीआरमध्ये नेमकं काय आहे?
- ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने मराठीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख असलेला जीआर काढला.
- हा निर्णय समोर येताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांचा थेट इशारा
- “मराठीतून शिकलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नसेल, तर मग कोण मराठीतून शिक्षण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
- त्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून, संध्याकाळपर्यंत हा जीआर मागे घ्यावा लागेल, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
- ठाणे महापालिकेने मराठी भाषा दिनानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला.
सरकारवर टीका
- “निवडणुकीच्या वेळी मराठी आठवते, पण प्रत्यक्ष कृती शून्य!” अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.
- “जर हा जीआर मागे घेतला नाही, तर उद्यापासून पुन्हा आंदोलन करु,” असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
- मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.
- ठाणे महापालिकेच्या या निर्णयावर सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.