गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत यांच्यावर संतप्त हल्ला : “बेलाज, बेशरम” म्हणत केले कठोर टीकास्त्र

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका केली आहे. राजकारणातील मतभेद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांमध्ये परिवर्तित होताना दिसत आहेत.

गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत यांच्यावर संतप्त हल्ला : "बेलाज, बेशरम" म्हणत केले कठोर टीकास्त्र शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका केली आहे. राजकारणातील मतभेद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांमध्ये परिवर्तित होताना दिसत आहेत.

मुद्दा निर्माण झाला अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान मधील मध्यस्थीच्या चर्चेवरून. संजय राऊत यांनी ट्रम्प यांना भारत-पाक संबंधात मध्यस्थीचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

गुलाबराव पाटील म्हणाले, “बेलाज, बेशरम लोक असे प्रश्न विचारत असतात. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर टीका करायच्या आधी, तुम्ही कोण आहात हे समजून घ्या. तुमची मध्यस्थी मातोश्रीवर पुरे. देशाच्या मुद्द्यांवर बोलण्याची लायकी तरी आहे का तुमच्याकडे?” अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी नुकतेच दिलेल्या वक्तव्यात, पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावरूनही गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना फटकारले. “तुम्ही एकदा तरी नगरसेवक झालात आहात का? आमदारांनी मत दिल्यामुळे तुम्ही खासदार झालात, आणि आज पंतप्रधानांवर टीका करताय? सध्याची वेळ ही देशाच्या बाजूने उभी राहण्याची आहे, घरच्या माणसांनीच जर अशा प्रकारे सरकारवर वार केले, तर देशाची काय अवस्था होईल, याचा विचार करा,” असा सल्लाही त्यांनी राऊत यांना दिला.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर विचारले असता, गुलाबराव पाटील म्हणाले की, “राजकारणात काहीही शक्य आहे. निवडणुका झाल्यावर कित्येक लोक दहा दिवसांत पक्ष बदलतात. त्यामुळे पवार काका आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.”

एकेकाळी एकत्र असलेले शिवसेनेतील हे दोन नेते आता विरुद्ध बाजूंवर आहेत. एकमेकांविरोधात ते वारंवार कठोर शब्दांत बोलत असून, आगामी राजकीय परिस्थितीत ही टोकाची टीका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top