कोल्हापूर: २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला, यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलं, “लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आम्ही अतिआत्मविश्वासात गेलो होतो. मतदार आपोआप साथ देतील असं गृहीत धरलं, आणि हीच आमची चूक ठरली.”
पाटील यांनी सांगितलं की, “ज्यावेळी एकसंघपणे लढणं गरजेचं होतं, त्यावेळी जागावाटप आणि उमेदवारीच्या वादात वेळ गेला. याचा थेट परिणाम प्रचारावर झाला.”

त्यांनी पुढे नमूद केलं की, महायुतीने योजनांचा प्रचार, जातींचं समीकरण आणि घराघरात पोहोचण्याचं काम प्रभावीपणे केलं, तर आघाडीच्या गोंधळामुळे मतदार गोंधळले.कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार मधुरीमराजे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावरही पाटील नाराजी व्यक्त करत म्हणाले की, “वरच्या पातळीवर निर्णय उशिरा घेतले गेले. स्थानिक पातळीवरील आम्हाला विश्वासात घेतलं नाही.”त्यांनी स्पष्ट केलं की हा पराभव दुसऱ्यामुळे नव्हे, तर आमच्याच अकार्यक्षमता, वेळेवर निर्णय न घेणं आणि आत्मसंतोषामुळे झाला आहे.