कोकणात उद्धव ठाकरेंना नवा आधार, काँग्रेसच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

गेल्या काही काळात सतत पक्षातून होणाऱ्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोकणातून दिलासा मिळाला आहे. राज्यभरातील विविध नेते आणि कार्यकर्ते एकामागोमाग एक पक्ष सोडत असताना, आता काँग्रेसचा एक प्रमुख नेता सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पक्षासाठी नवा उत्साह निर्माण केला आहे.

कोकणात उद्धव ठाकरेंना नवा आधार, काँग्रेसच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश गेल्या काही काळात सतत पक्षातून होणाऱ्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोकणातून दिलासा मिळाला आहे. राज्यभरातील विविध नेते आणि कार्यकर्ते एकामागोमाग एक पक्ष सोडत असताना, आता काँग्रेसचा एक प्रमुख नेता सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पक्षासाठी नवा उत्साह निर्माण केला आहे.

मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात सहदेव बेटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत सांगितले की, ‘जे गेले ते गेले, पण जे उभं करत होते ती माणसं आजही माझ्या सोबत आहेत. खरी शिवसेना हीच आहे, जी शब्दाला जागते. दुसरी ती गद्दारांची टोळी आहे.’

सहदेव बेटकर कोण आहेत?

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाचे प्रभावी नेते सहदेव बेटकर यांनी काँग्रेसमध्ये राहून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून ५२ हजार मते मिळवली होती. जरी ते निवडून आले नसले, तरी मतांची मोठी ताकद दाखवत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता. निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणात काहीसे शांत झाले होते. आता शिवसेनेत दाखल होऊन त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आहे.

पुढची दिशा काय?

या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत कोकणमध्ये पुन्हा पकड मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, ‘कोकणात निवडणुकीत कोण कसा जिंकला, याच्या मोठमोठ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. पण आता मी स्वतः कोकण दौऱ्यावर जाणार आहे. संपूर्ण कोकण पुन्हा एकदा शिवसेनेच्या नियंत्रणात आणणार.’

याच कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनीदेखील आपल्या शैलीत भाष्य करत म्हटले, ‘उद्धवजी हे श्रीकृष्ण आहेत, मी संजय आहे आणि आता सहदेवही सोबत आहेत. कोकणात लवकरच नव्या कुरुक्षेत्राची तयारी होणार असून, हे महायुद्ध आपण जिंकणारच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top