माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी जाहीर केलं की, आज ते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी मशाल आंदोलन करणार आहेत. कर्जमाफीचा विषय सातत्याने प्रलंबित ठेवल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

“शेतकरी उध्वस्त होत असताना सरकार मात्र कर्जमाफीसाठी मुहूर्त शोधतंय का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर थेट टीका केली. बावनकुळे यांनी नुकतंच म्हटलं होतं की, आमच्या सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा असून, कर्जमाफी नक्कीच केली जाईल. मात्र बच्चू कडू यांच्या मते, ही आश्वासने केवळ वेळकाढूपणाचे धोरण आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर विश्वासघाताचा आरोप करताना सांगितले की, “हा विषय फक्त घोषणा करण्यातच अडकलेला असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही.”