कराड तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर येत असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दमानिया म्हणाल्या की, “माझ्यापर्यंत या मारहाणीची अधिकृत माहिती आलेली नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, तुरुंगात मकोका अंतर्गत शिक्षा भोगत असलेले अनेक आरोपी आहेत. “हे वेगवेगळ्या टोळ्यांचे सदस्य असून त्यांच्यात पूर्वीपासून दुश्मनी होती. त्यामुळे जर तुरुंगात खरंच कोणाला मारहाण झाली असेल, तर त्यात फारसे आश्चर्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मारहाणीबाबत तुरुंग प्रशासनाचे अपयश?
यासोबतच तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दमानियांना याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले वेगवेगळ्या बराकमध्ये होते, तरीही ही मारहाण कशी झाली हे समजत नाही. यासंबंधी अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच निश्चित बोलता येईल.”
दमानियांच्या या प्रतिक्रियेमुळे कराड तुरुंगातील सुरक्षेच्या उपाययोजनांवरही चर्चा सुरू झाली आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती स्पष्ट होईल.