राज्याच्या विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. “ते टूरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेरून आरोप करून निघून जातात,” असा घणाघात शिंदेंनी केला.

‘पायऱ्यांवरून बघायचा चॅनलचा बूम अन् ठोकायची धूम’
शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानभवनाच्या पायऱ्यांवर पत्रकारांना प्रतिक्रिया देण्याच्या स्टाईलवरही निशाणा साधला. “पायऱ्यांवरून बघायचा चॅनलचा बूम अन् ठोकायची धूम” असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
संजय राऊत यांचा शिंदेंना जोरदार पलटवार
मुख्यमंत्री शिंदे यांच्या या टीकेनंतर संजय राऊत यांनी लगेच पलटवार केला.
राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात फारसं महत्त्व राहिलेलं नाही. आता फडणवीस बोलले की लोक ऐकतात, शिंदे बोलले तरी कोणी लक्ष देत नाही!”
त्यांनी आणखी टोला लगावत म्हटलं, “लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या… आता कोण ऐकणार?”
राजकीय संघर्ष आणखी वाढणार?
शिंदे आणि ठाकरे गटामधील हा वाद नवीन नाही, मात्र विधानसभेतील या शब्दयुद्धामुळे शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप-प्रत्यारोप आणखी वाढतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.