महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच एका सभेत बोलताना, “आता मी धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देतंय ते बघूया. आपण असा एक धक्का देऊ की, हे पुन्हा दिसणार नाहीत,” असे म्हणत शिंदे गटावर टीका केली होती. त्यांनी हे देखील सांगितले की, “जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत, तर आश्चर्य वाटते. तसंच आता उद्धव ठाकरेंना धक्का बसला नाही, तर लोकांना आश्चर्य वाटतं.”
शिंदेंचे प्रत्युत्तर
या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोक म्हणतात की मी धक्का पुरुष झालोय. पण विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांनाच असा धक्का दिला की, ते कायमस्वरूपी घरी बसले.” शिंदे यांनी हे देखील सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना धक्का देणाऱ्या लोकांना जनता धक्का न देता राहणार नाही. पक्ष वाढवणाऱ्या आणि चांगलं काम करणाऱ्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढणाऱ्या लोकांना जनता योग्य उत्तर देईल.”
राजकीय वातावरण तापले
शिंदे-ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप-प्रत्यारोप किती तीव्र होतील आणि त्याचा जनतेवर काय प्रभाव पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.