एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज मुंबईतील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या ते मातोश्रीवर पोहोचले असून, दोघांमधील संभाव्य चर्चेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जलील आणि ठाकरे यांच्यात काय चर्चा होणार? ही भेट केवळ शिष्टाचार म्हणून होत आहे की त्यामागे काही राजकीय संदर्भ आहेत? यावर सध्या अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी अनेक तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच ईदनिमित्त शिवसेना (उद्धव गट)चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या घरी संभाजीनगरमध्ये भेट दिली होती. त्या भेटीत दोघांमध्ये सखोल चर्चा झाल्याचं समजतं. त्या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवरील ही भेट विशेष महत्त्वाची ठरत आहे.
या बैठकीत कोणते मुद्दे चर्चिले जातील, संभाव्य युतीचा विषय निघेल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.