शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्यासाठी कोणतेही पद महत्त्वाचे नाही, तर राज्याचं हित सर्वात महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, “आज सरकारमध्ये ते आहेत, उद्या आम्हीही सत्तेवर येऊ. मात्र, ते सतत विरोधी पक्ष नेते पदासाठी संघर्ष करत राहतील.”

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (मविआ) विरोधी पक्षनेते पदाचा दावा केला आहे. याच संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “सत्ता आणि पदे ही येतात आणि जातात. मात्र, आमच्या दृष्टीने जनहित अधिक महत्त्वाचं आहे.” यासोबतच, त्यांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही जाहीर केला.
महाविकास आघाडीच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता आगामी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावर नेमकी काय भूमिका घेतली जाईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.