महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपमुख्यमंत्र्यांमध्ये हलक्या फुलक्या शाब्दिक टोमण्यांची देवाणघेवाण झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिंदे यांची मिश्किल टिप्पणी
या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारची नवीन टर्म असली तरी टीम जुनीच आहे. फक्त खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. अजित दादांची खुर्ची मात्र कायम आहे, त्यांना काही टेन्शन नाही.” या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
अजित पवारांचा खोचक प्रतिउत्तर
एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर अजित पवारांनीही हजरजबाबीपणे प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “तुम्हाला खुर्ची कायम ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?” त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, तर खुद्द शिंदे आणि फडणवीसही हसू आवरू शकले नाहीत.
फडणवीसांचा विरोधकांवर उपरोधिक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “विरोधकांनी आम्हाला ९ पानांचे पत्र दिले, पण त्यातील केवळ दोन नेत्यांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी ‘हम साथ साथ हैं’ नसून ‘हम आपके हैं कौन’ यासारखी वाटते.”
हा संवाद पाहता महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात हलकंफुलकं मनोरंजनही होत असल्याचं दिसून येत आहे.