अजित पवारांचा कठोर इशारा : ‘सुतासारखे सरळ करणार… नाहीतर मातीत घालणार!’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यात राख वाळू माफिया, भूमाफिया तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर शब्दांत हल्ला चढवला. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की, जर हे गट सुधारले नाहीत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

अजित पवारांचा कठोर इशारा : ‘सुतासारखे सरळ करणार… नाहीतर मातीत घालणार!’ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यात राख वाळू माफिया, भूमाफिया तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर शब्दांत हल्ला चढवला. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की, जर हे गट सुधारले नाहीत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

माफिया गटांवर कडक कारवाईचा इशारा

बीड जिल्ह्यात गेल्या काही काळात राख, वाळू आणि भूखंड माफियांची दहशत वाढली आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, “ही गुंडगिरी आता चालणार नाही. या गँग्सना सुतासारखे सरळ करायचंय, अन्यथा त्यांना मातीत घालायला वेळ लागणार नाही.”

अधिकाऱ्यांना थेट बदलीचा इशारा

अधिकाऱ्यांनी संगठीत गुन्हेगारीला पाठीशी घालू नये, अन्यथा कारवाई अटळ आहे, असा सज्जड दमही पवारांनी भरला. “सरकारी अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहत आहेत आणि गुन्हेगारीला समर्थन देत आहेत. आता बदल्या होणारच, तयारीत राहा!” असे ते म्हणाले.

सरपंच हत्या प्रकरणावरही कठोर भूमिका

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य करत पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिले. “जो दोषी असेल, त्याला पाठीशी घालणार नाही,” असा ठाम पुनरुच्चार त्यांनी केला.

कार्यकर्त्यांनाही स्पष्ट इशारा

फक्त माफिया आणि अधिकारीच नव्हे, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी स्पष्ट इशारा दिला. “सरकारमध्ये आहात म्हणून मनमानी करू नका. नियम पाळा, नाहीतर मीच पोलिसांना टायरमध्ये टाकायला सांगेन,” असे ते म्हणाले.

अजित पवारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बीडमधील प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता हे आदेश कितपत अंमलात येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top