सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, चार ते पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर नावाचा व्यक्ती त्यांच्या घरी आले होते. त्यांच्याकडे पंकजा मुंडे यांच्याविरोधात पूर्ण फाईल्स असल्याचा खुलासा अंजली दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “धनंजय मुंडे माझ्या घरी आले आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधातील सर्व फाईल्स माझ्याकडे आणल्या. त्यांनी मला सांगितले की मी पंकजा मुंडे विरोधात काम करावं.” परंतु, दमानिया यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “मी त्या फाईल्सवर काहीही काम करण्यास तयार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर धनंजय मुंडे त्या फाईल्स त्यांच्याजवळच ठेवून निघून गेले. अंजली दमानिया यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात हलचल निर्माण झाली आहे.